आमच्याबद्दल

एकता, बचत आणि समृद्धीचा विश्वासू मार्ग - युवा सहकार!

युवा सहकार ही 1994 साली सुरू झालेली एक सामाजिक आणि आर्थिक सहकार चळवळ आहे. "एकता, बचत आणि समृद्धी" या तत्त्वांवर आधारित, ही चळवळ लोकांना आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबन मिळवण्यासाठी प्रेरित करते. राजकारणमुक्त आणि व्यसनमुक्त समाजाची संकल्पना घेऊन, युवा सहकार बचत, कर्ज, स्वयंरोजगार आणि सामुदायिक विकासासाठी कार्यरत आहे. सध्या कल्याण, शाहापूर, अंबरनाथ आणि भिवंडी येथे १०१ शाखांसह १४३२ सभासद या चळवळीत सहभागी आहेत. आम्ही सभासदांना लवचिक बचत योजना, कमी व्याजदरावर कर्ज सुविधा आणि व्यवसाय वृद्धीसाठी मदत पुरवतो. शैक्षणिक मदत, आरोग्य शिबिरे, कार्यशाळा आणि प्रेरणादायी सहलींमधून सामाजिक आणि वैयक्तिक प्रगतीला चालना देतो. बॅनरबाजी न करता प्रत्यक्ष कृतीवर भर देणारी ही चळवळ प्रत्येक व्यक्तीसाठी उन्नतीचा मार्ग खुला करते. बचतीच्या माध्यमातून सामूहिक संपत्ती वाढवून समाजाचा विकास साधणे हे आमचे ध्येय आहे. ३० वर्षांच्या प्रवासात हजारो कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावला आहे. आपली आर्थिक आणि सामाजिक प्रगती साधण्यासाठी युवा सहकारच्या या चळवळीत सहभागी व्हा!

OUR SERVICE

We Service Now help Poor
people Lifes

    युवा सहकार – एक सहकार चळवळ

    एकता. बचत. समृद्धी
    स्थापना: 1994

    एकता, बचत आणि समृद्धी या त्रिसूत्रीवर व सहकार तत्वावर चालणारी चळवळ.
    संतांच्या खालील विचार प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करणारी चळवळ:

    • एकमेकांना साह्य करावे, अवघे धरू सुपंथ

    • एकीचे बळ मिळते फल

    • विना सहकार नाही उद्धार

    • विना संस्कार नाही सहकार

    • गाव करी तो राव न करी

    • सामर्थ्य आहे चळवळीचे

    • जो जो करील त्याचें

    • परि तो ते ईश्वराचे

    • आध्यात्म पाहिजे

    ही चळवळ म्हणजे:
    • तरुणांना बचतीचे महत्व, स्वत्व आणि तत्व सांगून सन्मार्ग दाखवणारी चळवळ.

    • बचत व त्यातून एकमेकांना साह्य करणारी चळवळ.

    कार्य विस्तार:
    • कल्याण, शाहो, अंबरनाथ आणि भिवंडी या ४ तालुक्यांत कार्य सुरू

    • एकूण शाखा: 101

    • सहभागी तरुण: 1432

    • दरवर्षी करोडों रुपयांची बचत केली जाते.

    • बचतीतून जमीन खरेदी करून स्वतःसाठी व समाजासाठी विकास साधला जातो.

    • बचतीतून विविध प्रकारच्या कंपन्या स्थापन केल्या आहेत.

    विशेष वैशिष्ट्ये:
    • कुठल्याही शाखेला, कुणालाही, कोणत्याही प्रकारची पदे दिली जात नाहीत.

    • राजकारणापासून अलिप्तता: राजकारणाला थारा नाही.

    • व्यसनबंदी: युवा सहकारच्या सभांना, शिबिरांना, सहलींना कोणत्याही प्रकारच्या व्यसनांना बंदी.

    • प्रसिद्धीबंदी: बॅनरबाजी चालत नाही. “माझे तुझे” प्रचार टाळला जातो.

    • गोपनीयता: 30 वर्षे गुप्त व सुस्थितीत चालवलेली चळवळ, सामान्य माणसांचे स्वावलंबन व स्वाभिमान जागृत करणारी.

    • कठोर नियमन: कठोर आणि स्वतंत्र नियमन प्रणाली, शिस्तीचे पालन अनिवार्य

    युवा सहकार चळवळीचे फायदे
    • सामाजिक एकजूट वाढते.

    • सहकारातून उद्योगधंद्यासाठी सहजतेने भांडवल उपलब्ध होते.

    • नकळत बचतीची व बँकिंगची सवय लागते.

    • कोणतेही कागदपत्र न देता गरजेनुसार सहज मदत मिळू शकते.

    • सहकारातून घेतलेल्या कर्जावर व्याज बाहेर जाण्याऐवजी स्वतःलाच मिळते.

    • बचतीची जबाबदारी स्वीकारल्याने व्यसने आपोआप कमी होतात.

    • आर्थिक मदत व आपत्ती काळात सहकार्य मिळते.

    • दिवाळी बोनस मिळतो.

    • सहली व पर्यटन आयोजित केले जाते.

    • मासिक पेन्शन मिळते.

    • लोकसंग्रह वाढतो व समाज संघटन होते.

    • व्यसन निर्मूलन होते.

    • रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीला चालना मिळते.

    • एकमेकांच्या आवश्यक उद्योगांना मदत मिळते.

    • एकटेपणा दूर होतो, संघटनातून समाधान व आनंद मिळतो.

    • वक्तृत्व कला आणि सार्वजनिक जीवनात वावरण्याचा आत्मविश्वास वाढतो.

    • स्वयंमंच व्यासपीठ उपलब्ध होते.

Go Back Top